दुबईच्या विमानतळावर 66 भारतीय अडकले

    दुबई – संयुक्‍त अमिराती सरकारच्या “इमिग्रेशन’शी संबंधित नियमांची पूर्तता न केल्यामुळे 66 भारतीयांना दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकून पडण्याची वेळ आली आहे. या अडकून राहिलेल्या भारतीयांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे, असे संयुक्‍त अरब अमिरातीतील भारतीय दूतावास आणि भारतीय वाणिज्य दूतावासातील अधिकारी नीरज अगरवाल यांनी सांगितले.

    दिल्लीहून गोएअरच्या विमानाने आलेले सुमारे 59 प्रवासी आता 48 तासांहून अधिक काळ अडकले आहेत. या प्रवाशांना अन्न व इतर साहित्य देण्यात येत असून भारतीय दूतावासाने या संदर्भात प्रादेशिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे, असे त्यांनी सांगितले.

    दरम्यान “इमिग्रेशन’ नियमांचे पालन न केल्याबद्दल तब्बल 1,200 पाकिस्तानी प्रवासीदेखील अडकून पडले आहेत. या प्रवाशांजवळ हॉटेलचे आरक्षण, नातेवाईकांचे संपर्काचे तपशील आणि परतीची आगाऊ तिकीटेही आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here