दिवसाला विना मास्क फिरणाऱ्या 100 जणांवर कारवाई करा; पोलीस आयुक्तांचे मुंबई पोलिसांना टार्गेट

424

मुंबई : मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई पोलिसांना सुद्धा कठोर कारवाई करण्याचे  आदेश दिले आहेत. प्रशासनाने निर्देश  दिल्यानंतर आता मुंबई पोलीस आयुक्तांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला दिवसाला 100 विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यासोबतच आता मुंबई पोलिसांवर कामाचा दुहेरी ताण पडल्याचं दबक्या आवाजात म्हटलं जातं आहे. 

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या झपाट्याने वाढत असून आता विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे टार्गेट मुंबई पोलिसांना देण्यात आले आहे.  प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसाला 100 कारवाया करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. 

मुंबईत ज्यांनी मास्क घातला नसेल त्यांच्याकडून 200 रुपये दंड आकरण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. हे निर्देश मुंबईमधील प्रत्येक पोलीस स्टेशनला देण्यात आले आहेत मुंबई मध्ये एकूण 94 पोलीस स्टेशन आहे . दोनशे रुपये दंडातील शंभर रुपये हे महानगरपालिकेला जातील तर शंभर रुपये पोलीस कल्याण निधीमध्ये जमा केले जाणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुद्धा मुंबई पोलिसांना अशाच प्रकारचे आदेश देण्यात आले होते. सप्टेंबर 2019 पर्यंत मुंबई पोलिसांनी नऊ कोटी रुपये  दंड आकारून जमा केले होते. मात्र लोकांकडून दंड देण्यास खूप वेळा मनाई केली जात आहे. लोकांच्या थेट संपर्कात आल्यामुळे पोलिस दलातील पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या झपट्याने वाढत आहे..

जानेवारी 2020 ते मार्च 2021 पर्यंत 3 लाख 76 हजार 915 नागरिकांवर कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार थांबण्यासाठी दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here