दाऊदचे भारतात हल्ले करण्याचे कारस्थान उघड; राजकीय नेते, उद्योजक हिटलिस्टवर

752

नवी दिल्ली : मुंबईत १९९३ मध्ये साखळी बॉम्बस्फोट घडविणारा कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याने आता पुन्हा भारतात हल्ले करण्याचे कारस्थान रचले आहे. त्यातही प्रामुख्याने मुंबई, दिल्ली या शहरांवर त्याचे लक्ष आहे. भारतातील राजकीय नेते, प्रख्यात उद्योगपती हे दाऊद इब्राहिमच्या हिटलिस्टवर आहेत. ही माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या एका एफआयआरमधून उघड झाली आहे.

एनआयएने म्हटले आहे की, भारतामध्ये स्फोटके व शस्त्रांचा वापर करून पुन्हा प्राणघातक हल्ले चढविण्याचा दाऊद इब्राहिमने कट आखला आहे. दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची सध्या ईडी एका मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशी करत आहे. यातील पैसा दहशतवादी कारवायांसाठी पुरविण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here