
पारनेर : तालुक्यातील कामोठे (Kamothe) येथे स्थित असलेल्या पारनेर करांच्या वतीने दहीहंडी उत्सव (Dahi Handi) आयोजित करण्यात आला आहे. उद्या (ता.७) श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज मंदिर सेक्टर ३६ मध्ये वेगवेगळे गोविंदा पथक (Govinda Squad) थर लावणार आहेत.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल येथील नामांकित गोविंदा पथकांना येथे निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानिमित्त पारनेर रहिवासी संघाने विजेत्या गोविंद पथकांना मोठे बक्षीस ठेवले आहे. ही दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या गोविंदा पथकाला ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक भाऊ पावडे आणि कुंडलिक वापरे यांनी दिली आहे.
पारनेर तालुक्यातील अनेक जण मुंबई व उपनगरात व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत. कामोठे येथे पारनेरकरांचे अडीच हजार कुटुंब वास्तव्याला आहे. हे सर्वजण संघटित झाले आहेत. त्यांनी पारनेर रहिवासी संघाची स्थापना केली आहे. त्याच माध्यमातून हा दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
कामोठे येथील सेक्टर ३६ येथे पारनेर रहिवासी संघाची दहीहंडी लावण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात बक्षीसांची खैरात करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजता दहीहंडी पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती झाल्यानंतर दहा वाजता गोविंद पथकाच्या सलामीला सुरुवात होणार आहे. सायंकाळी मानाची पथके दहीहंडीचा थर लावणार आहेत. संगीत भजनाचे त्याचबरोबर आर्केस्ट्रा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निलेश आहेर यांनी दिली आहे.