दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात बोर्ड आज जाहीर करणार भूमिका
पुणे : बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढच्या महिन्यापासून सुरू होत आहेत. वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 15 मार्च पासून तर बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे. या परीक्षांसंदर्भात आज सकाळी साडेअकरा वाजता मंडळाकडून पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर केली जाणार आहे. या पत्रकार परिषदेत परीक्षा ऑफलाईन कि ऑनलाईन याबाबत माहिती देण्यात येईल.