महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून नियोजित असलेली दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2020-21 ही ऐनवेळी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता रद्द करावी लागली होती. गेल्या वर्षी दहावी-बारावीची परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काचा अंशतः परतावा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षा रद्द केल्या होत्या. दरम्यान, राज्य मंडळाला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत करावे लागणार आहे.यासाठी शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा तपशील 12 नोव्हेंबर सकाळी 11 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरायचा आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी ? http://feerefund.mh-ssc.ac.in या लिंकवर भरायचा आहे बारावीच्या विद्यार्थ्यांनी https://feerefund.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून / लिंकव्दारे नोंदणी करणे आवश्यक आहे. दहावी बारावी बोर्ड परीक्षा ही जरी त्यावेळी रद्द झाली होती. तरी या परीक्षेचे तयारीचे काम पूर्ण झाले होते. सोबतच प्रश्नपत्रिका सुद्धा छापून तयार होत्या. त्यामुळे मंडळाला यासाठी जमा झालेल्या परीक्षा शुल्कातून खर्च करावा लागला होता. त्यामुळे हा खर्च विचारात घेऊन अंशतः परीक्षा शुल्काचा परतावा हा विद्यार्थ्यांना दिला जाईल. मागील सहा महिन्यांपासून जमा असलेले परीक्षा शुल्काचे कोट्यावधी रुपये शिक्षण विभागाने तातडीने परत करावे अशी मागणी वारंवार केली जात होती. अखेर आता हे परीक्षा शुल्क परत केले जात आहेत.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
“प्री-वेडिंग शूट आमच्या संस्कृतीत नाही”: छत्तीसगड महिला पॅनेल प्रमुख
रायपूर: छत्तीसगड राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ किरणमयी नायक यांनी शनिवारी सांगितले की, लग्नाआधीचे फोटो आणि व्हिडिओ...
HAL ने एअरशोमध्ये दाखवलेल्या HLFT-42 विमानाच्या शेपटातून ‘हनुमान’ चित्र काढून टाकले
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने मंगळवारी बेंगळुरू येथील एरो इंडिया 2023 इव्हेंटमध्ये प्रदर्शित केलेल्या एचएलएफटी-42 विमान मॉडेलच्या...
यूपीच्या जालौनमध्ये बस उलटल्याने 5 ठार, 15 जखमी
जालौन, उत्तर प्रदेश: शनिवारी रात्री जालौन जिल्ह्यातील मधौगढ पोलीस स्टेशन हद्दीतील गोपालपुराजवळ बस उलटून झालेल्या भीषण अपघातात...
सुरत – चेन्नईभूसंपादन : नितीनगडकरी व शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला हा निर्णय !
त्यानंतर भूसंपादन मोबदल्याबाबत फेरविचार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे निर्देश ना. गडकरी यांनी विभागाला दिले आहेत.



