यंदा कोरोना संसर्गामुळे पुरवणी परीक्षेबाबत काहीच स्पष्टता नव्हती. मात्र माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे 12वीच्या परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणार आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना या फेरपरीक्षेला बसायचे आहे, ते विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. अर्ज भरण्याच्या तारखा राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केल्या आहेत.
✍? फेरपरीक्षा किंवा पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
▪️ नियमित शुल्कासह अर्ज करणे – 20 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2020
▪️ विलंब शुल्कासह अर्ज करणे – 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2020