
मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (एमपीएससी) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवड करण्यात आली होती. पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. ९ जून रोजी ती पुण्यात आली होती. सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे ती राहत होती. १२ जून रोजी सिंहगड किल्ल्यावर निघाली आहे, असे मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. दर्शनाने कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली होती. तिच्यासोबत तिचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे होता. १२ जूननंतर तिचा मोबाइल क्रमांक बंद झाला. तिच्या कुटुंबीयांनी संपर्क साधला. मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली.
दरम्यान, दर्शना पवार हिचा मृतदेह हा राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत सापडला. ती आणि तिचा मित्र राहुल हे दोघे राजगड किल्यावर ट्रेकिंगला गेले. त्यानंतर परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती.
दर्शनासोबत लग्न करण्याची राहूलची इच्छा होती. दोघेही एम पी एस सी ची परिक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमधे दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परिक्षा उत्तीर्ण केली. वनअधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहूल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एम पी एस सी ची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा… तो देखील परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे दर्शना आणि तीच्या कुटुंबीयांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहूलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली. परिक्षेपूर्वी राहुलने दर्शना बरोबर ब्रेकअप केले होते. यानंतर दर्शना अधिकारी झाल्यानंतर तो पुन्हा लग्नासाठी दर्शनाच्या मागे लागला होता.
कोण आहे राहुल हांडोरे?
राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शाह गावाचा आहे. त्याने BSC चं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर तो पुण्यात MPSC ची तयारी करत होता. दर्शना आणि राहुल यांची ओळख पुण्यातच झाली होती. मागील काही महिन्यांपासून दर्शना आणि राहुल एकमेकांच्या संपर्कात होते.






