दरोड्याची तयारी, घरफोडी चोरी व चोरी अशा एकूण ५ गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी कि, दिनांक ११/०१/२०२१ रोजीचे रात्री मौजे गणेशवाडी, झोळे, ता. संगमनेर येथील गणपती मंदीराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून मंदीरामधील दानपेटी, एम्प्लीफायर व ईको मिक्सर मशिन असा एकूण ६५,०००/-रु. किं. चा मुद्देमाल व रोख रक्कम चोरुन नेली होती. त्याबाबत फिर्यादी श्री. सतिष तुकाराम येवले, वय ४२ वर्षे, धंदा- शेती, रा. गणेशवाडी, झोळे, ता. संगमनेर यांनी संगमनेर तालूका पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ४६/२०२१, भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.
नमुद गुन्ह्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेला आरोपी सतिष उर्फ संतोष मेंगाळ, रा. धामनगाव आवारी, ता. अकोले. जि. अहमदनगर हा गुन्हा केल्यापासून फरार झालेला होता. तसेच यापुर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यातही तो फरार असल्याने व फरार राहून गुन्हे करीत असल्याने नमुद फरार आरोपीचा श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत असताना पोनि/ अनिल कटके यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली कि आरोपी सतीष उर्फ संतोष मेंगाळ हा अकोले बस स्टैंड येथे येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ/ दत्तात्रय हिंगडे, पोना/शंकर चौधरी, संदीप दरंदले, दिपक शिंदे, पोकॉ/रणजित जाधव, चालक पोहेकॉ/ उमाकांत गावडे अशांनी मिळून अकोले बस स्टैंड येथे जावून व सापळा लावून आरोपी नामे सतिष उर्फ संतोष नाथू मेंगाळ, वय १९ वर्ष, रा. धामनगाव आवारी, ता. अकोले यास ताब्यात घेवून संगमनेर तालुका पो.स्टे. हजर केले आहे. पुढील कार्यवाही संगमनेर तालुका पो.स्टे. करीत आहेत.
वरील नमुद आरोपी विरुध्द दरोड्याची तयारी, घरफोडी चोरी व चोरी या स्वरुपाचे खालील दाखल असून सदर गुन्ह्यात आरोपी अद्यापपावेतो फरार होता.
१) संगमनेर तालुका पो.स्टे. गुरनं. २८/ २०२१ भादवि कलम ३९९, ४०२ (फरार) ३९ / २०२१ भादवि कलम ३७९ (फरार)
२) संगमनेर तालुका पो.स्टे. गुरनं.
३) संगमनेर तालुका पो.स्टे. गुरनं. ४० / २०२१ भादवि कलम ३७९ (फरार )
T५९/ २०२० भादवि कलम ३७९ (फरार) ५) संगमनेर तालुका पो.स्टे. गुरनं. ४६/२०२१ भादवि कलम ४५७, ३८० (फरार)
४) संगमनेर तालुका पो.स्टे. गुरनं.
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री. राहूल मदने साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.





