दरेवाडीत आई व मुलाला घरात कोंडून चौघांनी केली बेदम मारहाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहराजवळील दरेवाडी येथील हरीमळा परिसरात किरकोळ कारणातून आई व मुलाला घरात कोंडून ठेवत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन जिवे मारण्यची धमकी दिल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी शर्मिला दीपककुमार मेट्या (वय 40, रा.हरीमळा,दरेवाडी) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मेट्या यांच्या मुलगा अंकुशकुमार हा घराकडे जात असताना त्यास सोहम विक्रम दिवटे याने सायकलचा धक्का मारुन शिवगीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याचा जाब विचारायला गेलेल्या त्याच्या आईला सोहम दिवटे याची आई, मामा व आईच्या वडीलांनी शिवीगाळ करून मारहाण केली तसेच त्यांना घरात कोंडून घेत घराला बाहेरुन कुलूप लावले व जिवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरन पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भा.दं.वि.क. 452, 342, 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.





