थेट आपण आमदार असल्याचे भासवत लोकांना फसवणाऱ्या तोतया आमदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या:

आमदार असल्याचे भासवत लोकांना फसवणाऱ्या तोतया आमदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक : बनावट वेष धारण करून लोकांची फसवणूक करणारी अनेक प्रकरण समोर आली आहेत. मात्र आता जे प्रकरण समोर आलंय ते थोडं हटके आहे. हे प्रकरण पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. यावेळी थेट आपण आमदार असल्याचे भासवत लोकांना फसवणाऱ्या तोतया आमदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चारचाकी महागड्या वाहनावर राजमुद्रा, आमदारांना असलेला प्रवेशपास अशी अनेक बनावट कागदपत्रे वापरून लोकांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.गाडीवर विधानसभा अधिवेशन कालावधीकरीता वाहन प्रवेश पास लोगोचा स्टीकर लावुन व लोकप्रतिनिधी तसेच शासकीय वाहन असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करीत लोकांची फसवणूक करणाऱ्या तोतयास वणी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान त्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे लेटर पॅड, तसेच माजी आमदार अनिल कदम यांचे ओळखपत्राचा गैरवापर करीत मंत्र्याशी जवळचे संबघ असल्याचे सांगितले आहे.तसेच पुढे शाळा अनुदानित करुन देण्यासाठी दीड लाखांची रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. या तोतया लोकसेवकास न्यायालयाने ३ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच मिळालेल्या माहिती नुसार त्यानूसार २९ तारखेस रात्री १ वाजेच्या सुमारास वणी पोलीस ठाणे हद्दीत शिंदवड गावाच्या त्रिफुलींवर संशयीत आरोपी राहुल दिलीपराव आहेर, वय ३२ वर्षे रा. शिंदवड ता. दिंडोरी जि. नाशिक याला ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here