वायव्य भारतातून थंडीला सुरूवात झाली असून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सध्या हिमवृष्टी सुरू आहे. तर दिल्ली, पंजाब, राज्यस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यात तीव्र थंडीची लाट धडकली आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर थंडीची लाट आल्याने राज्यातील किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. *पुढील दोन दिवस राज्यात हवामान जैसे थे राहणार..* हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. पुढील दोन दिवस राज्यात हवामान जैसे थे राहणार आहे. पण त्यानंतर 21 डिंसेबरपासून राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होण्याची शक्यता आहे. *राज्यात गारठा वाढला..!* महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 2 ते 3 अंशानी घटला असून पुढील दोन दिवस राज्यात हीच स्थिती कायमq राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वायव्य भारतात सकाळी आणि सायंकाळी तापमान सरासरी तापमानापेक्षा खाली घसरत आहेत. त्यामुळे राजस्थानात थंडीच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहेत. तर दिल्लीत येलो अलर्ट जारी केला आहे.▪️ आज पुण्यात देखील किमान तापमानात प्रचंड घसरण झाली आहे. पुण्यातील शिरूर याठिकाणी आज सकाळी 9.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. यासोबतच हवेली आणि पाषण या दोन्ही ठिकाणचं ताप वामान 10.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं आहे. तर दुसरीकडे विदर्भात देखील गारठा वाढला असून नागपुरातील वातावरण 11 ते 13 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदलं आहे.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
मोठी बातमी: तनपुरेंच्या कामगारांच्या १४ दिवसापासून सुरू असलेले उपोषण सुटले
मोठी बातमी: तनपुरेंच्या कामगारांच्या १४ दिवसापासून सुरू असलेले उपोषण सुटले
राहुरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना कामगार बांधवानी आपल्या...
Coal India Limited under the Ministry of Coal has launched a new software
Coal India Limited under the Ministry of Coal has launched a new software named Spectral Enhancement SPE which will help in identifying...
2022 मध्ये भारतातील वाघांची संख्या 3,167 होती, ताज्या जनगणनेची आकडेवारी उघड करते
म्हैसूर (KTK): 2022 मध्ये भारतात वाघांची संख्या 3,167 होती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जारी केलेल्या...
गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा
गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा
गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा ...






