जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन : ‘ती’ कोविड सेंटर्स राज्यशासनामार्फत चालवा! राष्ट्रवादी काँग्रेसचे मतीन सय्यद यांची मागणी!
अहमदनगर : ( ८ एप्रिल ) कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटे मध्ये कोविड १९ च्या रुग्णांवर उपचार करतांना ज्या १६ कोविड सेंटर्स चालकांनी शासन नियम डावलून अतिरिक्त बिलांची आकारणी करत रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट केली, ती सर्व म्हणजे १६ कोविड सेंटर्स तात्काळ बंद करण्यात आणि ती सर्व कोविड सेंटर्स राज्यशासनामार्फत चालविण्यात यावीत, अशी मागणी भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मतीन सय्यद यांनी केलीय .
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात सय्यद यांनी म्हटलं आहे, की अहमदनगर शहर आणि परिसरातल्या १६ नामांकित खासगी रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर्स सुरु करण्यात आली होती. मात्र या खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना व्हायरसच्या कोविड रुग्णांवर उपचार करतांना या कोविड सेंटर्सच्या चालकांनी अर्थात खासगी डाॅक्टरांनी राज्यशासनाच्या नियमांची पायनल्ली करत प्रत्येक रुग्णांच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारली होती. आकारण्यात आलेल्या या अतिरिक्त बिलांच्या तपासणीसाठी एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीने जिल्हा प्रशासनाला एक असा अहवाल दिला होता, की या १६ कोविड सेंटर्सच्या चालकांनी कोविड रुग्णांच्या प्रत्येक नातेवाईकांकडून तब्बल 1 कोटी 12 लाख 66 हजार 192 रुपयांची रक्कम अतिरिक्त बिलांच्या मार्फत आकारली आहेत. या अहवालानंतर बोटांवर मोजता येणार्या काही खासगी रुग्णालयांनी अतिरिक्त बिलांची रक्कम अहमदनगर महानगरपालिकेत जमा केल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र तरी देखील १ कोटी १३ लाखांच्या अतिरिक्त बिलांची थकित रक्कम अद्यापही थकित आहे.
त्यामुळे या सर्व १६ कोविड सेंटर्सच्या संचालकांविरुध्द मुंबई नर्सिंग होमच्या कलम ७ आणि ८ अन्वये कारवाई करण्यात यावी. ही सर्व कोविड सेंटर्स बंद करुन ती कोविड सेंटर्स राज्यशासनामार्फत चालविण्यात यावी. या व्यतिरिक्त ज्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून अतिरिक्त बिले घेण्यात आली आहेत,
अशा व्यक्तींनी मो. नं. 9850073019 आणि 9225301445 वर संपर्क साधावा,
असं आवाहन मतीन सय्यद यांनी सदर निवेदनाद्वारे केलं आहे.