‘त्या’ पाच डॉक्टरांना अद्यापही अटक नाहीच…! अहिल्यानगरच्या पोलिसांवर नक्की कोणाचा आहे दबाव…?

    59

    कोविड महामारीच्या कालावधीत (२०२१) एका सहृदयी माणसाचे वडील साधा खोकला आला म्हणून अहिल्यानगरच्या (त्यावेळचं अहमदनगर) एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले. मात्र त्या गल्लाभरु, नालायक आणि स्वार्थी डॉक्टरनं कोविड आजाराची लक्षणं असल्याचं सांगून त्या रुग्णाला बळजबरीनं दाखल करुन घेतलं. त्या रुग्णावर चुकीचे वैद्यकीय उपचार केले, त्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून कोट्यवधी रुपये उकळले आणि दुर्दैवानं त्या सहृदयी माणसाचे वडील त्यांच्या डोळ्यासमोर मरण पावले.

    अशोक खोकराळे यांचे वडील बबनराव खोकराळे यांचा फक्त आणि फक्त डॉक्टरच्या स्वार्थी वृत्तीमुळेच मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अशोक खोकराळे यांनी केलेल्या तब्बल चार वर्षांच्या अथक पाठपुरानंतर आज (दि. १८) खऱ्या अर्थाने यश आलं आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात डॉ. गोपाळ बहुरुपी यांच्यासह पाच डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एवढं सगळं होऊनही त्या डॉक्टरांना अटक करण्यात अहिल्यानगर पोलिसांना अद्यापही यश आलेलं नाही. वास्तविक पाहता फरार गुन्हेगारांना अटक करण्यात अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) प्रचंड हातखंडा आहे. परंतू खोकराळे यांच्या मृत्युला जबाबदार असलेल्या या डॉक्टरांना अटक न करण्यासाठी अहिल्यानगरच्या पोलिसांवर नक्की कोणाचा दबाव आहे? दबाव असेल तर तो कोणाचा आणि दबाव नसल्यास त्या पाच डॉक्टरांना अटक करण्यात अहिल्यानगरच्या पोलिसांना अजूनही यश का आलेलं नाही, हाच खरा प्रश्न आहे.

    २०२१ मध्ये आलेल्या कोविड महामारीमध्ये रुग्णावर केलेल्या चुकीच्या वैद्यकीय उपचारामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने अहिल्यानगरच्या पाच डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासह अन्य गंभीर भारतीय दंड कलमान्वये तोफखाना पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

    कोविड महामारीत चुकीच्या वैद्यकीय उपचारामुळे बबनराव नारायण खोकराळे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यांचे चिरंजीव अशोक खोकराळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात धाव घेतली. तब्बल चार वर्षांच्या अथक पाठपुराव्यानंतर अहिल्यानगरच्या पाच डॉक्टरांविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. या पाच डॉक्टरांमध्ये अहिल्यानगरचे न्यूक्लिअस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर, कोविड सेंटरचे डॉ. सचिन पांडोळे, झावरे हॉस्पिटलचे अक्षदीप झावरे, ग्लोबस पॅथॉलॉजी अँड इम्युनोअसचे डॉ. मुकुंद तांदळे यांचा समावेश आहे.

    तोफखाना पोलीस नक्की काय करताहेत ?

    सात्विक वृत्ती असलेले, पांडुरंगाच्या भक्तीमध्ये संपूर्ण आयुष्य व्यतित केलेले, सरळमार्गी आणि प्रत्येकाला सन्मार्गावर नेणाऱ्या बबनराव खोकराळे यांना कोरोना नसतानाही चुकीचे उपचार करुन त्यांच्या मृत्युला कारणीभूत असल्याचा डॉ. गोपाळ बहुरुपी आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांविरुद्ध अशोक खोकराळे यांचा आरोप आहे. अशोक कराळे यांनी यासाठी गेल्या पाच वर्षांपासून अथक पाठपुरावा केला. परंतू तोफखाना पोलिसांनी संबंधितांना अटक केली नाही. अशोक खोकराळे यांनी कंटाळून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. विशेष म्हणजे न्यायालयाने आदेश देऊनही तोफखाना पोलिसांनी संबंधित डॉक्टरांना अटक करण्यात आलेली नाही.

    त्यामुळे तोफखाना पोलीस नक्की काय करताहेत,

    असा प्रश्न उपस्थित केला जात आहे… तर खोकराळे करणार मुंबईत आमरण उपोषण…!

    अहिल्या नगर जिल्ह्याचे एसपी सोमनाथ घार्गे यांची कार्यपद्धती अतिशय चांगली आहे. नगर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम एसपी घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितपणे सुरु आहे. फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची कारवाईदेखील एसपी घार्गे यांच्या दबदब्यामुळे व्यवस्थित पार पाडली जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्याची स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) एस.पी. घार्गे यांच्या कडक शिस्तीमुळे अहोरात्र कार्यरत आहे. परंतू नगर शहर आणि परिसरातल्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये प्रचंड असा बेजबाबदारपणा पाहायला मिळत आहे. अक्षरशः न्यायालयाच्या आदेशाचादेखील हे पोलीस अवमान करत आहेत. या सर्व प्रकाराला कंटाळून आणि आरोपींना अटक होईपर्यंत अशोक खोकराळे हे लवकरच मुंबईच्या आझाद मैदानावर अभिनव पद्धतीने उपोषण करणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here