
नगर जिल्ह्यातील भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार प्रा . राम शिंदे यांच्यामध्ये चांगलेच वाकयुद्ध भडकले आहे.भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी एकत्रित प्रवास करत मोहटा देवीचे दर्शन घेतले होते. त्यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी टीका केली होती. या टीकेला आता पुन्हा एकदा आमदार राम शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
आम्ही महायुती आघाडी मधील आमदारांना बरोबर घेऊन एकत्रित प्रवास करतो मात्र खासदार सुजय विखे पाटील जेव्हा महाविकास आघाडी विरोधात होती तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना घेऊन फिरत होते. तेव्हा त्यांना युती धर्म दिसला नाही का असा सवाल करत आता आमच्यावर लक्ष ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे आमदार राम शिंदे यांनी म्हटले.