
ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या एका डिनर पार्टीमध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वादावादी होऊन प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. यावेळी ‘तू बाहेर चल तुझं तोंडच फोडतो’, अशी धमकी एका अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्याला दिली. ही घटना वॉशिंग्टन डीसीमधीली एका विशेष क्लब एक्झिक्युटिव्ह ब्रँचचं उदघाटन आणि एक पॉडकास्ट होस्ट चमथ पालिहपितिया यांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमावेळी घडली. सेक्रेटरी ऑफ फायनान्स म्हणजेच अमेरिकेचे वित्तमंत्री स्कॉट बेसेन्ट आणि फेडरल हौसिंग फायनान्स एजन्सीचे डायरेक्टर बिल पुल्टे यांच्यात ही वादावादी झाली.