तूर हमीभाव खरेदी योजना खरीप हंगाम 2021-2022 खरेदी केंद्र सुरु: कृषि उत्पन्न बाजार समिती,पारनेर.

    *तूर हमीभाव खरेदी योजना खरीप हंगाम 2021-2022 खरेदी केंद्र सुरु*

    *कृषि उत्पन्न बाजार समिती,पारनेर*

    शेतमाल तुर शासन हमीभाव 6300/- प्रति क्विंटल नोंदणी सुरू

    दि.20/12/2021 पासुन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

    1). शेतकरी ७/१२ व ८ अ उतारा (मूळ प्रतीवर तूर या शेतमालाची खरीप हंगाम 2021-2022 ची फक्त आँनलाईन पिक पेरा नोंद आवश्यक आहे.

    २.चालू बँक खाते पासबुक खाते नंबर पूर्ण आवश्यक आहे. व आय एफ एस सी कोड नंबर सह तसेच आधार लिंक असलेले बँक खाते देण्यात यावे.

    ३.आधार कार्डची छायांकित प्रत.

    – शेतकरी यांना सूचना –

    १.नोंदणी साठी आवश्यक सर्व दस्तावेज हे स्पष्ट दिसेल असे असावे तसेच नोंदणी आपल्यासमोर करण्यात येईल त्यामुळे भरण्यात येणारी सर्व माहिती बँक डीटेल्स बरोबर असल्याची खात्री करण्यात यावी. तसेच नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्वरीत आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरती एसएमएस येईल.

    २.खरेदीही ही फक्त एफ ए क्यु प्रतीच्या शेतमालाची केली जाते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती की आपला शेतमाल हा स्वच्छ व वाळवून ,काडी कचरा,दगड माती विरहीत[आद्रता बारा टक्केपेक्षा जास्त नसावी ] खरेदी केंद्रावर घेऊन यावा.

    ३.आपला शेतमाल खरेदी केंद्रावर खरेदी झाल्यानंतर त्वरित ऑनलाईन काटा पट्टी घेण्यात यावी .सदर खरेदी योजनेमध्ये केवळ ऑनलाईन काटा पट्टी ग्राहय आहे. ४.खरेदी झालेल्या शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाईन पद्धतीने जमा होणार आहे. त्यामुळे नोंदणी करताना चालु बँक खात्याची डिटेल्स बिनचूक व स्पष्ट दिसेल असे देण्यात यावे अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यात रक्कम वर्ग होऊ शकते.

    – नोंदणी ठिकाण -कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर कार्यालय (शनिवार कार्यालयाला सुट्टी राहील) – संपर्कासाठी नंबर –

    श्री सुरेश आढाव मो.नं. 9028055070

    श्री राजू चेडे मो.नं.9028055064

    आपले नम्रसभापती/उपसभापती

    प्रभारी सचिव

    कृषी उत्पन्न बाजार समिती,

    पारनेर (मो.९४२११५५४९२)

    जिल्ह मार्केटिंग अधिकारी

    अहमदनगर

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here