
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात गेल्या 3 वर्षांपासुन ड्रग्ज तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ड्रग्ज तस्करात मंदिरातीलच अकरा पुजारी समाविष्ट असल्याची माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर मंदिर संस्थानाने मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर संस्थान आरोपी पुजाऱ्यांवर कायमची प्रवेश बंदी करणार आहे.
याप्रकरणी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजा यांनी पोलिसांना पत्र देऊन तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे. ही यादी प्राप्त होताच ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी पुजाऱ्यांवर देऊळ ए कवायत या मंदिर संस्थांच्या कायद्यानुसार कायमची मंदिर प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. आरोपी पुजाऱ्यांची नावे वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.