
Beed Crime Story: 10 ते 12 जणांकडून बेदम मारहाण केल्याची घटना बीडच्या गेवराईमध्ये घडली आहे. तपभूमी येथील वारकरी संप्रदायाच्या संस्थान शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.Beed Crime: तुला नीट वापस जायचं आहे का? डांबून ठेवत एकाला बेदम मारहाण; बीडमधील वारकरी सांप्रदायाच्या शाळेतील प्रकार
बीड: बीडमधील मारामारी अन् गुन्हेगारीच्या घटना काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. मुलाच्या शिक्षणासाठी भरलेली फी परत मागितल्याने वडिलांना 10 ते 12 जणांकडून बेदम मारहाण केल्याची घटना बीडच्या गेवराईमध्ये घडली आहे. तपभूमी येथील वारकरी संप्रदायाच्या संस्थान शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चिखली येथील मनोहर कचरू वारे यांचा मुलगा संप्रदायिक शिक्षण घेण्यासाठी बीडच्या तपभूमी वारकरी शिक्षण संस्थेत शिकण्यासाठी पाठवण्यात आला होता. यासाठी 50 हजार रुपये डोनेशन ची मागणी संस्थांचे सत्यवान महाराज लाटे यांनी केली. त्यापैकी 30 हजार रुपये मनोहर कचरू वारे यांनी दिले होते.
मात्र मुलांच्या काही अडचणीमुळे ऍडमिशन कॅन्सल झाल्यामुळे पैसे वापस मागितले. असता तू आम्हाला पैसे वापस मागतो का तुला जर आम्ही पैसे दिले तर आम्हाला सर्वांना पैसे द्यावे लागतील, तुला नीट वापस जायचं आहे का? नसता तू या डोंगराच्या बाहेर सुद्धा जाणार नाहीस असं म्हणत 10 ते 12 जणांकडून संस्थानावरील खोलीमध्ये कोंडून अमानुष मारहाण करण्यात आली आहे. पायावरती हातावरती आणि पाठीवरती मारहाण केल्याचे व्रण दिसत आहेत आणि याचाच व्हिडिओ सध्याला व्हायरल देखील होत आहे. महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून माझ्या जीवितस धोका आहे. त्यांच्यावरती कडक कार्यवाही करावी अशी मागणी विद्यार्थ्यांचे पालक मनोहर कचरू वारे यांनी केली आहे. ते सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत.




