तीन कोतीन कोटींची सुपारी घेतल्याचे सांगत नगरसवेकला खून करण्याची धमकी पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

549
  • अहमदनगर (दि १४ एप्रिल २०२२) प्रतिनिधी : केडगाव येथील शिवसेना नगरसेवक अमोल येवले यांना जिवे मारण्यासाठी तीन कोटींची सुपारी घेतल्याचे सांगत खून करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. दारुच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
  • आकाश पवार (रा. गोपाळ गल्ली, केडगाव) असे त्याचे नाव आहे. त्याने येवले यांना फोन करुन ‘मला तुझी सुपारी मिळाली असून, तुझा मर्डर करणार आहे’, असा दम दिला. त्याचा भाऊ सचिन पवार याला फोन केला असता, त्यानेही आकाश याला तुला मारण्यासाठी तीन कोटींची सुपारी मिळाली आहे, असे सांगितल्याची तक्रार येवले यांनी दिली होती. कोतवाली पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी पवार याला ताब्यात घेऊन चौकशी केली. दारुच्या नशेत त्याने हा प्रकार केल्याचे समोर आल्यावर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे सपोनि रवींद्र पिंगळे यांनी सांगितले.
  • Ahmednagar Crime : दरम्यान, नगरसवेक येवले यांना तिघांकडून जिवे मारण्याची धमकी देत हॉटेलसमोर गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी अभिजीत अर्जुन कोतकर (वय ३२, रा. कोतकर मळा, केडगाव) यांच्या फिर्यादीवरुन स्वतंत्र गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला वर्ग करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here