
राज्यात उष्णतेचा पाऱ्याने टोक गाठत असल्याचे चित्र असून आज विदर्भ मराठवाडा प्रचंड तापला आहे. बहुतांश ठिकाणी 40-45 अंश सेल्सियसच्या नोंदी होत आहेत. IMD ने नोंदवलेल्या कमाल तापमानानुसार, आज राज्याच्या उपराजधानीत नागपुरात तब्बल 44.7 अंश सेल्सियस इतक्या राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये प्रचंड उष्ण हवामान राहणार आहे. तर पुणे, सोलापूर जिल्ह्यातही आज उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय. 21 एप्रील रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, नागपूरमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तुमच्या जिल्ह्यात तापमान काय ?
नागपूर – 44.7°C, परभणी – 43.6°C,चंद्रपूर – 44.0°C, ब्रम्हपुरी – 43.6°C, वर्धा43.0°C, गोंदिया – 44.0°C, अमरावती43.8°C, यवतमाळ 42.5°C, वाशीम -41.8°C, अकोला – 43.5°C, बुलढाणा40.0°C, औरंगाबाद – 41.7°C, जळगाव -41.7°C, लातूर – 41.2°C, बीड 42.6°C, हिंगोली – 42.1°C, पुणे – 39.4°C, नाशिक – 37.3°C, सातारा 39.7°C, सांगली -37.1°C, मुंबई उपनगर – 33.0°C, मुंबई शहर – 33.4°C, ठाणे 36.0°C, पालघर 35.2°C, रत्नागिरी – 32.9°C, सिंधुदुर्ग -32.0°C.





