तांबटकर प्रीमियर लीग सीजनचे नगर क्लब शेजारील ग्राउंड वर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न…

    288

    महाराष्ट्र इलेव्हन संघ विजयी.

    मुलांमध्ये खेळाडूवृत्ती मैदानी खेळातून विकसीत होते – माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक

    नगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर क्लब येथील ग्राउंड येथे माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांनी आयोजित केलेल्या तांबटकर प्रीमियर लीग सीजन 8 चे आयोजन केले होते या टूर्नामेंटमध्ये अनेक संघांनी सहभाग नोंदविला होता या स्पर्धेतील खेळाडूंनी आपली उत्तम कामगिरी दाखवून आपल्या संघास विजयी केले व अंतिम सामना महाराष्ट्र इलेव्हन विरुद्ध इंदोर वाला या संघामध्ये सामना रंगला होता मात्र इंदोर वाला संघाचे नऊ गडी बाद होऊन महाराष्ट्र इलेव्हन या संघाने आपला विजय मिळून त्या संघास ट्रॉफी प्रशस्तीपत्र देताना माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक समवेत नागोरी मुस्लिम जमात ट्रस्टचे इस्तेखार खान, अमन शेख शेरू सर जावेद शेख आलम खान फरान खान नवीद खान रियान खान, उमरखान सुफियान खान जवाद खान, मुजम्मिल खान जहीर खान साजिद भैय्या मोहसीन काजी समीर शेख आदीसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक म्हणाले की, खेळाडूंना चालना देण्यासाठी दरवर्षी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. व मोबाईलच्या आहारी गेलेल्या युवकांना मैदानी खेळातून बाहेर पडता येणार आहे. खेळातून मन व शरीर सदृढ बनते. पराभवाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने पुढे जाण्याचे व विजयाने हुरळून न जाता पुढे वाटचाल करण्याचे खेळाडूवृत्ती मैदानी खेळातून विकसीत होत असते. यासाठी पालकांनी मुलांना मैदानाकडे घेऊन येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

    मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी…………………..

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here