तलाठीचा केला विनयभंग, पोलिसात गुन्हा दाखल

तलाठीचा केला विनयभंग, पोलिसात गुन्हा दाखल

21 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील चिंचोलीफाटा येथिल प्रवरा नदी पाञातील अवैध वाळू उपसावर दोन दिवसापुर्वी केलेल्या कारवाई नंतर त्याठिकाणी पुन्हा वाळू उपसा सुरु झाला का ? याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका महिला कामगार तलाठीस अश्लिल शिवीगाळ करुन लज्जा उत्पन्न असे वर्तन करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वाळू तस्करावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुञा कडून समजलेली माहिती अशी की,तालुक्यातील महिला कामगार तलाठी व दोन कर्मचारी चिंचोलीफाटा येथिल प्रवरा नदी पाञात पाहणी करीत असताना तेथे वाळू तस्करी करणारा महेश राजेंद्र सोनवणे आला व त्याने महिला तलाठीस तु माझे वाळूचे तरफा कोणाला विचारुन सोडून दिले. असे म्हणून अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन लज्जा उत्तन्न होईल असे वर्तन करुन’ तु चिंचोलीफाटा येथे कशी काम करते’ तेच पाहतो अशी धमकी देवून महिला तलाठी हिचा विनयभंग करुन सरकारी कामात अडथळा आणला.सदर महिला तलाठी कामगार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेश राजेंद्र सोनवणे यांच्या विरोधात सरकारी महिला कर्मचारीचा विनयभंग व सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक निरज बोकील हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here