
दिनांक १६/०४/२०२३ रोजी कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अहमदनगर शहरातील गाडगीळ पटांगण येथे इसमनामे सनि संतोष भुजबळ हा बेकायदेशीर तलवार बाळगुन असुन गुन्हा करण्याचे बेतात आहे. आत्ता गेल्यास तो मिळुन येईल अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोनि चंद्रशेखर यादव यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांना सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमीतील नमुद इसमास जागीच पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सनि संतोष भुजबळ वय-२१ वर्ष रा पर्जन्यश्वर मंदिराचे जवळ दातरंगेमळा, अहमदनगर असे सांगुन त्याचे कब्जात एक तलवार मिळुन आली आहे. त्याचे कब्जात मिळुन आलेली तलवार ही त्याने कोठुन तसेच कोणत्या कामासाठी आणलेले आहे. याबाबत त्याचेकडे विचारपुस केली असता सदरची तलवार ही माझीच असल्याचे कबुल केले. सदर कारवाईबाबत पोका / १९३० अशोक पोपट कांबळे यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं.३७६/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना/सलीम शेख हे करत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई मनोज महाजन, पोसई मनोज कचरे, सफौ/राजेंद्र गर्गे, पोना/सलीम शेख, अभय कदम, अतुल काजळे, याकुब सय्यद, अशोक कांबळे, अशोक सायकर यांच्या पथकाने केली आहे.
