… तर लॉकडाऊनची पर्वा करता अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्ड कार्यालयावर उग्र आंदोलन!

    861

    … तर लॉकडाऊनची पर्वा करता अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्ड कार्यालयावर उग्र आंदोलन!

    अहमदनगर :
    सर्वत्र कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना शहर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची नितांत गरज आहे. मात्र अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्डाच्या आडमुठ्या धोरणामुळे चक्क लोकवस्तीशेजारीच कचराडेपो करण्यात आलाय. ही अत्यंत निंदनीय आणि बेजबाबदारपणाची निर्णय प्रक्रिया आहे, असा आरोप करत येत्या काही दिवसांत लोकवस्तीशेजारचा हा कचराडेपो अन्यत्र हलविण्यात आला नाही तर लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची कुठलीही पर्वा न करता अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयावर उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे भिंगार शहराध्यक्ष सिद्धार्थ आढाव यांनी दिलाय.
    आढाव यांनी भिंगारच्या इंदिरानगर, इराणीरोड या लोकवस्तीशेजारच्या अनधिकृत कचराडेपोजवळ उभा राहून एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडिओद्वारे आढाव यांनी अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, स्वच्छता निरीक्षक रमेश साके आणि त्यांचे सहकारी भोर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

    ते म्हणाले, स्वच्छता निरीक्षक साके आणि काही शिक्षकांच्या आधारे अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासन नाक्यांवर प्रवेश कर वसूल करते आहे. कचरा संकलनासासाठी लाखो रुपयांची निविदा दिली जाते. शेकडो कर्मचारी यासाठी राबराब राबतात आणि हा सारा कचरा लोकवस्तीच्या शेजारी आणून टाकला जातो.

    यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना साथीच्या आजारांची लागण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिंगार शहर स्वच्छ ठेवण्याऐवजी या शहरात दुर्गंधी पसरविण्याचा कपटी डाव रचला जात आहे.

    दरेवाडी येथे अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्डाचा हक्काचा कचराडेपो असतांना प्रशासन लोकवस्तीशेजारीच कचराडेपो करण्याचा घाट का रचत आहे? यामुळे भिंगारमध्ये रोगराई पसरणार नाही का? अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाला भिंगारच्या जनतेची काहीच काळजी नाही का? असे विविध प्रश्न उपस्थित करत या गंभीर समस्येकडे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आ. संग्राम जगताप यांचे लक्ष वेधणार असल्याचे आढाव म्हणाले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here