
अहमदनगर. :-युवकावर चॉपर,रॉड,दांडके याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि.५ मार्च रविवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास रामवाडी परिसरातील यशाजंली हॉटेलच्या महेश थेटर जवळ घडली होती.अमन युनूस शेख (माणिक चौक) असे जखमी युवकाचे नाव आहे.त्याच्यावर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.उपचारादरम्यान अमन युनूस शेख याने तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून निखील धंगेकर, रूद्रेश अंबाडे,विशाल जाधव, कृष्णा भागानगरे,गामा भागानगरे,शिवम घोलप, अक्षय बंटी साबळे व त्यांच्या सोबतचे इतर अनोळखी १० ते १५ इसम यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास तोफखाना सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ करीत आहेत.




