- जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, गुजरातसह देशातील अनेक भागात पतंगाचा खेळ रंगतो. अशावेळी प्रतिबंध असलेला मांजा न वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. जयंत सामलच्या कुटुंबीयांनी मांजा विक्रेता आणि त्याचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात जगतपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. काचेचे तुकडे असलेल्या मांजामुळे अशा अनेक जीवघेण्या घटना घडल्या आहेत. यामुळे ओदिशा हायकोर्टाने कटक आणि आसपासच्या भागात मांजाच्या वापरावर बंदी घातली आहे.
- पतंगाचा मांजा चाकू-सुऱ्यासारखाच धारदार असल्याने त्यामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. सरकारने मांजावर पूर्णपणे बंदी आणणे आवश्यक आहे. मांजामुळे गळा कापून अनेक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. ओदिशातील कटकमध्येही पतंगाच्या मांजाने अशाच प्रकारे एकाचा मृत्यू झाला. लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
- मांजा त्याच्या चेहऱ्यावर आला व गळा चिरला
- ओदिशातील कटकमधील भैरीपूर भागात जयंत सामलराहत होता. तो रविवारी आपल्या बाईकने सासुरवाडीला चालला होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली. जयंतची पत्नीही त्याच्यासोबत बाईकवर मागे बसली होती. पीरबाजार भागातून जात असताना अचानक पतंगाच्या मांजा त्याच्या चेहऱ्यावर आला आणि तो जखमी झाला.
- दाम्पत्य बाईकवरुन खाली पडले
- पतंगाचा मांजा चाकू-सुऱ्यासारखाच धारदार असल्याने या मांजामुळे जयंतचा गळा चिरला गेला. त्यामुळे रक्ताची चिळकांडी उडाली. जयंतचं बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि दोघंही जण खाली पडले. पादचाऱ्यांनी दाम्पत्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी जयंतला मृत घोषित केलं. जयंतचं अवघ्या काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. तरुण मुलाच्या निधनामुळे सामल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तो राहत असलेल्या परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
- मांजाच्या वापरावर बंदी