
नगर : अहिल्यानगर शहरात शिवशक्ती-भीमशक्तीजनआक्रोश मोर्चाचे रविवारी (ता. १२) रोजी आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमधून प्रतिक्रिया येत आहेत. या मोर्चात आंबेडकरी समाजाचा कुठलाही संबंध नव्हता. काही लोक डॉ. आंबेडकरांचा फोटो घेऊन राजकारण करत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे तरुणांनो नेत्यांच्या नादी लागू नका, अशा प्रतिक्रिया येत आहेत.





