तमिळनाडूमध्ये संरक्षणप्रमुखांचे हेलिकाॅप्टर कोसळले, अपघातात 4 ठार, 3 जखमी

394

तमिळनाडूमधील निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमध्ये बुधवारी (ता. 8) लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात भारताचे संरक्षण प्रमुख (CDS) बिपीन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंब व लष्करातील काही अधिकारी प्रवास करीत असल्याचे समजते. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. भारतीय हवाई दलानेही याबाबत ट्विट करुन या घटनेची माहिती दिली आहे. या हेलिकॉप्टरने स्वत: बिपीन रावत, त्यांच्या पत्नी, लष्करी अधिकारी, सुरक्षारक्षक व कमांडोज असे 14 जण प्रवास करीत होते. एका कार्यक्रमासाठी हे सगळे हेलिकाॅप्टरमधून जात होते. तमिळनाडूमधील निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमध्ये अचानक हे हेलिकाॅप्टर क्रॅश झाले. खराब हवामानामुळे हेलिकाॅप्टरला अपघात झाल्याचे सांगण्यात येते.. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात हेलिकॉप्टर पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसतेय. *घटनास्थळी बचावकार्य सुरू*या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याचे सांगितलं जाते. तसेच तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिपीन रावत हेही या घटनेत जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू होते, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here