आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला, कोर्टानं नाकारला जामीन
आर्यन खानचे वकील आता हायकोर्टात (High Court) जामिनासाठी धाव धेवू शकतात.
मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Bollywood Actor Shahrukh Khan) सुपुत्र आर्यन खानच्या (Aryan Khan) अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे. क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Party Case) अटकेत असलेल्या आर्यन खानला आजही दिलासा मिळाला नाही. विशेष कोर्टानं (Special NDPS Court) आर्यन खानला जामीन नामंजूर केला आहे. आर्यन खानसह कोर्टानं अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धामेचा हिला देखील जामीन नाकारला आहे. त्यामुळे आर्यन खानसह तिघांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. आता आर्यन खानचे वकील हायकोर्टात (High Court) जामिनासाठी धाव धेवू शकतात.
आर्यन खान आणि एक्ट्रेसचं WhatsApp Chat उघड
क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकणाला (Cruise Drugs Party Case) वेगळं वळण लागलं आहे. ते म्हणजे, आर्यन खान आणि बॉलिवूडमधील एका नवोदित अभिनेत्रीचे व्हॉट्सअॅपवरील संभाषण ( WhatsApp Chat) उघड झाल्यानं खळबळ उडाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) आर्यन आणि अभिनेत्रीचं व्हॉट्सअॅप चॅट कोर्टात सादर केले आहेत. त्यामुळेच कदाचित आर्यनचा जामीन नामंजूर करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई पोलिसांना क्रुझ ड्रग्ज पार्टीशी संबंधित व्हॉट्सऍप चॅट सापडले असल्याचा दावा NCB नं केला आहे. हे चॅट आर्यन खान आणि नवोदित अभिनेत्रीचं आहे. NCB नं व्हॉट्सऍप चॅट कोर्टात सादर केले आहेत. मुंबईत समुद्रात क्रुझवर ड्रग्स पार्टी करताना आर्यन खानसह आठ जणांना NCB च्या अधिकाऱ्यांनी 2 ऑक्टोबरला अटक केली होती. त्यानंतर आर्यन खानसह सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आर्यन खानला सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे.
विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खानची उच्च न्यायालयात धाव
ड्रग्स प्रकरणाला नवं वळण, आर्यन खान आणि एक्ट्रेसचं WhatsApp Chat उघड





