ड्रग्स कनेक्शनमध्ये नाव आल्यानंतर अभिनेत्री दिया मिर्झाने सोशल मिडियावर व्यक्त केला संताप
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झाचं ड्रग कनेक्शनमध्ये नाव आल्यानंतर तिने सोशल मिडियावर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तिने ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय की तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर ड्रग्स तिने घेतलेले नाहीत. दियाने एकामागोमाग एक असे तीन ट्विट केले आहेत.
हे ही वाचा: दीपिका पदूकोणनंतर ड्रग कनेक्शनमध्ये आता दिया मिर्झाचं नाव आलं समोर, NCB करणार चौकशी
अभिनेत्री दिया मिर्झाने ट्विट करत म्हटलं आहे की ‘मी या बातमीचं दृढ आणि स्पष्टपणे खंडन करते कारण हे आरोप निराधार आहेत आणि चूकीच्या उद्देशाने लावण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या चुकीच्या वार्तांकनाचा परिणाम माझ्या प्रतिमेवर होत आहे आणि यामुळे माझ्या करिअरला देखील नुकसान होतंय जे मी इतकी वर्ष मेहनतीने उभं केलं आहे. मी माझ्या आयुष्यात कधीच कोणत्याही प्रकारचे मादक द्रव्य खरेदी केले नाहीत किंवा त्यांचं सेवनही केलं नाही. मी एक भारतीय नागरिक असण्याच्या नात्याने माझ्यासाठी उपलब्ध असलेल्या कायद्यांचा वापर करेन. माझ्या पाठिशी असलेल्या चाहत्यांचे धन्यवाद.’