
अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने इराणसोबत तेल आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या व्यापारात सहभागी असल्याबद्दल 6 भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.
अमेरिकेचे हे पाऊल कमाल दबाव धोरणाचा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या म्हणण्यानुसार, कार्यकारी आदेश 13846 अंतर्गत 6 भारतीय कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे इराणी तेल किंवा पेट्रोकेमिकल्स खरेदी करण्याचा निर्णय घेणाऱ्या कोणत्याही देशाला किंवा व्यक्तीला अमेरिकेसोबत व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाणार नाही. अमेरिकेने भारतातील कांचन पॉलिमर्स, अल्केमिकल सोल्युशन्स, रमणिकलाल एस गोसालिया अँड कंपनी, ज्युपिटर डाई केम प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबल इंडस्ट्रियल केमिकल्स लिमिटेड आणि पर्सिस्टंट पेट्रोकेम प्रायव्हेट लिमिटेडवरया कंपन्यांवर बंदी घातली आहे.
अमेरिकेच्या या कारवायांमुळे भारत-अमेरिका व्यापारसंबंधांवर दबाव येण्याची शक्यता आहे. भारतासाठी अमेरिका हा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार आहे आणि अशा प्रकारच्या थेट बंदीमुळे भविष्यातील गुंतवणूक व आयात-निर्यात संबंधांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.