डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह 75 देशांना दिलासा, अमेरिकेचा टॅरिफवर 90 दिवसांचा पॉज; चीनला मात्र शिक्षा

    119

    अमेरिकेच्या ट्रेड आणि टॅरिफ वॉरमध्ये मोठा ट्विस्ट आला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवीन आदेश जारी केला आहे, ज्यामुळे एकीकडे चीनला दणका बसला तर भारतासह काही देशांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल. तसेच ट्रम्प यांच्या नव्या आदेशाने अमेरिकन शेअर बाजारातही उत्साह पाहायला मिळाला आहे.

    डोनाल्ड ट्रम्प यांनी 75 देशांसाठी जाहीर केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफवर 90 दिवसांची स्थगिती आणली आहे. ज्या 75 पेक्षा जास्त देशांनी अमेरिकेच्या ट्रेड, टॅरिफ, करन्सी आणि इतर नॉन मोनेटरी मुद्यावर चर्चा करण्याची इच्छा दाखवली आहे. त्यांच्याविरोधात अमेरिकन सरकार कोणतीही कारवाई करणार नाही. पण चीनवर मात्र टॅरिफवर आणखी वाढवला आहे. चीनवर आता टॅरिफ 125 टक्के वाढवला आहे.

    आता टॅरिफ लादलेल्या देशांना पुढील रणनीती बनवण्यास मदत होईल. या कालावधीत परस्पर शुल्कात लक्षणीय घट करून 10% करण्यात आले आहे. तसेच चीनने 8 एप्रिलपर्यंत ही 34% टॅरिफ वाढ रद्द केली नाही, तर अमेरिका 9 एप्रिलपासून 50% अतिरिक्त टॅरिफ लागू करेल. यासोबतच चीनसोबत प्रस्तावित कोणतीही बैठक थांबवली जाईल आणि इतर देशांशी नव्या वाटाघाटी तत्काळ सुरू होतील, अशी धमकीच आधीच ट्रम्प यांनी दिली होती.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here