डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल, विळदघाट येथे २०० बेडच्या कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे.

694
  • दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव बघता डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल, विळदघाट येथे २०० बेडच्या कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे.
  • विशेष म्हणजे या हॉस्पिटलमध्ये सध्याची गरज लक्षात घेता सुमारे १५० बेडस् ला ऑक्सिजनचा सप्लाय जोडण्यात आला आहे.
  • या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेमध्ये कार्यरत असलेले सामुदायिक आरोग्य अधिकारी (सिएचओ) व सर्व आरोग्याशी निगडित असणारा नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टर्सची बैठक खासदार डॉ. सुजय विखेपाटील यांनी घेतली व येथील सर्व नियोजनाबाबत चर्चा केली.
  • लवकरात लवकर या सेंटरची निर्मिती करून रुग्णांवर उपचार केले जातील. यामुळे सर्व अहमदनगर वासीयांना मोठा दिलासा मिळेल. असे खासदार डॉ. सुजय विखेपाटील यांनी सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here