डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त डी. जे. लावून मिरवणुक काढल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष व डीजे मालकाविरूध्द शहर पोलिसांनी गुन्हे दाखल ही आहे नावं

1157
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त डी. जे. लावून मिरवणुक काढल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष व डीजे मालकाविरूध्द शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
  • या प्रकरणी कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्यादी दाखल झाल्या आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आठ आरोपींचा समावेश आहे.
  • यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विशाल गायकवाड, डीजे मालक राम शंकर माने (रा. पुणे), निलक्रांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष अजय सुधाकर साळवे,
  • डीजे मालक भुषण रामनाथ शेटे (रा. निमगाव पागा ता. संगमनेर), सावेडी शाखा आरपीआय मंडळाचे अध्यक्ष जयंत छगन भिंगारदिवे (रा. सावेडीगाव),
  • डीजे मालक संतोष बाबासाहेब वाघ (रा. नागापूर), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष किरण दाभाडे (रा. सिध्दार्थनगर), डीजे मालक नदिम नजिर खान (रा. केडगाव) यांचा समावेश आहे.
  • कोतवाली पोलीस ठाण्यात दोन मंडळाच्या अध्यक्षासह दोन डीजे मालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरपीआय (गवई गट) मंडळाचे अध्यक्ष सुशांत गिरीधर म्हस्के,
  • डीजे मालक संतोष धाला धामणे (रा. भुतकरवाडी), डॉ. आंबेडकर नगर मित्र मंडळ माळीवाडाचे अध्यक्ष सुजित सुभाष घंगाळे, डीजे मालक विवेक सुभाष रूपनवर (रा. केडगाव चौफुला ता. दौंड, जि. पुणे) यांचा समावेश आहे.
  • मंडळाचे अध्यक्ष, डीजे मालक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त डीजे लावून मिरवणुक काढली. सर्वोच्च न्यायालयाने ठरवुन दिलेल्या क्षमतेपेक्षा मोठ्या आवाजात ध्वनी प्रदुषण करून सदर ठिकाणाहून येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना व घटनास्थळाच्या आसपास राहणार्‍या नागरिकांना त्रास होईल असे वर्तन केले.
  • पोलिसांनी डीजेचा आवाज कमी करण्याबाबत दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्याने आरोपींविरूध्द भादंवि कलम 186, 188, 34 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here