डिजीटल सदस्य नोंदणी अभियान जनआंदोलन बनवा!: नाना पटोले

487
  • प्रांताध्यक्षांची जिल्हाध्यक्ष व निरीक्षकांसोबत ऑनलाईन बैठक संपन्न.
  • मुंबई, दि. ८ जानेवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हाती घेतलेले डिजीटल सदस्य नोंदणी अभियान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात यशस्वी करावयाचे आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातून सर्वात जास्त सदस्य नोंदणी व्हावी असा आपला प्रयत्न असून यासाठी डिजीटल सदस्यता नोंदणी अभियान हे ‘जनआंदोलन’ बनवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
  • डिजीटल सदस्यता नोंदणी अभियानासंदर्भात प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी आज सर्व जिल्हाध्यक्ष व जिल्हा निरीक्षक यांची झूम मिटिंग घेऊन या अभियानाबद्दल माहिती दिली.
  • यावेळी मार्गदर्शन करताना पटोले पुढे म्हणाले की, या अभियानासाठी प्रत्येक बुथवर चार स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाईल यासाठी तीन पुरुष व एक महिला स्वयंसेवकाचे नाव निश्चित करावयाचे आहे. या स्वयंसेवकांना महसूल विभाग मुख्यालयी तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. डीजीटल सदस्य नोंदणी अभियान हे पारदर्शक व विश्वासार्ह आहे. सदस्य नोंदणीनंतर त्यांना ओळखपत्रही दिले जाणार आहे. महाराष्ट्राने नेहमीच राष्ट्रीय पातळीवरील सर्व कार्यक्रमात मोठे योगदान दिलेले आहे, आताही या डिजीटल सदस्य नोंदणी अभियानात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून मोठे योगदान द्यावे, असे प्रांताध्यक्ष म्हणाले.
  • यावेळी प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे व सोशल मीडिया राज्य प्रमुख विशाल मुत्तेमवारही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here