डिजिटल अरेस्ट’ दाखवत डॉक्टरकडून ऑनलाईन उकळले ७ कोटी १७ लाख

    124

    अहिल्यानगर – सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमातून श्रीरामपूर येथील एका ज्येष्ठ डॉक्टरांकडून तब्बल ७ कोटी १७ लाख २५ हजार रूपये लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हेगारांनी सर्वोच्च न्यायालय, ईडी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्य नावाने बनावट कागदपत्रे पाठवून डॉक्टरांना घाबरवले व वेळोवेळी त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम हस्तांतरित करून घेतली. या प्रकरणी डॉक्टरांनी १३ ऑक्टोबर रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, विविध मोबाईल क्रमांक व खातेदारांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    फिर्यादी डॉक्टरांना ७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान अनोळखी मोबाईल क्रमांकांवरून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल येत होते. एका कॉलमध्ये डॉक्टरांना एक नंबर पाठवून हा तुमचा नंबर आहे का? अशी चौकशी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांवर अवैध जाहिरात, अश्लीलता आणि त्रास देणे (हरॅशमेंट) यासंबंधी प्रकरण दाखल असल्याचे सांगण्यात आले. यानंतर आरोपींनी स्वतःला पोलीस अधिकारी देविलाल सिंग आणि न्यायाधीश म्हणून सादर करत, तुम्हाला डिजिटल अरेस्ट केले आहे असे सांगून डॉक्टरांना घरात नजरकैदेत असल्याची भीती दाखवली. त्यांनी डॉक्टरांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असल्याचेही सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here