डायबेटीस औषधांच्या किमती वाढवता येणार नाही, ‘एनपीपीए’चा मोठा निर्णय
भारतात मधुमेही रुग्णांची संख्या 7.7 कोटी आहे. या मधुमेही रुग्यांसाठी आवश्यक असलेल्या 12 औषधांच्या किंमतीवर राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) नियंत्रण आणले आहे. त्यामुळे कंपन्यांना आता या औषधांच्या किमती वाढविता येणार नसल्याचे समजते.
मधुमेहावरील औषधे रुग्णांना स्वस्त दरात मिळावीत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मधुमेहावरील 12 औषधींच्या किमतीवर कमाल मर्यादा घालण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक किमती कंपन्या वाढवू शकणार नसल्याचे ‘एनपीपीए’मार्फत सांगण्यात आले.
किती असतील औषधांच्या किंमती?
▪️ ‘ग्लिमप्राइड’च्या 1 मि. ग्रॅ. टॅबलेटची किंमत 3.6 रुपयांपेक्षा अधिक, तर 2 मि. ग्रॅ. टॅबलेटची किंमत 5.72 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही.
▪️ 1 मि. लि. ‘ग्लुकोज इंजेक्शन’ची (25 % ) किंमत 17 पैसे असेल.
▪️ 1 मि. लि. इन्सुलिन इंजेक्शनची किंमत 15.09 रुपये असेल.
▪️ ‘मेटाफार्मिन’ नियंत्रणासाठीच्या 100 मि. ग्रॅ. टॅबलेटची किंमत 3.066 रुपये, 750 मि. ग्रॅ.साठी 2.4 रुपये, तर 500 मि. ग्रॅ. साठी 1.92 रुपये असेल.





