डाक जीवन विमा एजंट पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

763

औरंगाबाद डाक विभागात डाक जीवन विमा/ग्रामीण डाक जीवन विमा एजंट थेट मुलाखतीद्वारे नेमणे आहेत.

??सर्व इच्छुकांनी प्रवर अधीक्षक, डाकघर, औरंगाबाद विभाग, जुना बाजार, औरंगाबाद- 431 001 यांचे कार्यालयात जन्म तारीख व शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठी लागणारे मुळ कागदपत्रे, त्या कागदपत्रांची एक साक्षंकित प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड व दोन पासपोर्ट आकाराच्या छायाचित्र तसेच खालील नमुन्यातील अर्जांसह दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 04.00 वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे प्रवर अधीक्षक डाकघर औरंगाबाद यांनी कळविले आहे.

??यासाठीचे पात्रता निकष पूढील प्रमाणे आहे.
➖ वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष,
➖ शैक्षणिक पात्रता–अर्जदार हा किमान 10 वी उत्तीर्ण अथवा केंद्र/राज्य सरकार मान्यताप्राप्त समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
➖ श्रेणी – सुशिक्षित बेरोजगार,
➖ निवृत्त ‍शिक्षक,
➖ माजी सैनिक,
➖ अंगणवाडी सेविका,
➖ महिला बचत गट,
➖ माजी जीवन विमा सल्लागार/इतर विमा कंपन्यामध्ये माजी अभिकर्ते / स्वयंरोजगार वा उपरोक्त पात्रता असलेले इच्छुक,
➖ व्यावसायिक कौशल्य,
➖ व्यक्तिमत्व,
➖ जीवन विम्या बाबतचे ज्ञान,
➖ संगणकाचे ज्ञान
तसेच
➖ स्थानिक परिसराची माहिती इत्यादी बाबी आवश्यक.

?? उमेदवारांची निवड थेट मुलाखतीव्दारे करण्यात येईल.
➖निवड झालेल्या उमेदवारास रु. 5000/- ची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवणे बंधनकारक जी कि राष्ट्रीय बचत पत्र/किसान विकास पत्र स्वरुपात असेल.

?? प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल, जो IRDA ची परवाना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कायम स्वरुपाच्या परवान्यामध्ये रुपांतरीत केला जाईल. नियुक्ती ही लायसन्स तसेच कमिशन तत्वावर असेल. असेही प्रवर अधीक्षक डाकघर औरंगाबाद यांनी कळविले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here