ठळक बातम्या

    415

    १)शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा* शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (26 नोव्हेंबर) सकाळीच साडे आठ वाजल्यापासून ईडीचं पथक खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यात दाखल झाले. 12 जणांच्या या पथकाने घराचे दरवाजे आतून लावून घेत तपासणी केली.*२)केंद्र सरकार क्रिमी लेयरची मर्यादा वाढवणार*पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी EWS ची मर्यादा बदलणार.८ लाखांहून १० किंवा १२ लाखांची मर्यादा वाढणार.४ आठवड्यात सरकार घेणार मोठा निर्णय.*३)सतेज ऊर्फ बंटी पाटील बिनविरोध*कोल्हापूरात विधान परिषद निवडणूक बिनविरोध, अमोल महाडिकांनी माघार घेतल्यामुळे सतेज पाटलांच्या विजयाचा मार्ग मोकळा*४)राज्यातील २१ डेपो अंशतः सुरु*परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कामगारांना शुक्रवार सकाळपर्यंत अल्टिमेटम दिला. त्याप्रमाणे महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार राज्यभरातील २१ डेपो अंशतः सुरु झाले असून ९ हजार ७०५ कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here