ठळक बातम्या

464

१)“आता वेगळी आघाडी करणं म्हणजे भाजपाला मदत करणं होईल”, संजय राऊत* शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वेगळी आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नावर निशाणा साधला आहे. सध्या वेगळी आघाडी तयार करणं म्हणजे भाजपाला मदत करणं होईल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. असं केल्यास ‘तुला न मला, घाल कुत्र्याला’ या म्हणीप्रमाणे स्थिती तयार होईल, असंही त्यांनी नमूद केलं. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.*२)कर्नाटकपाठोपाठ गुजरातमध्येही ओमायक्रॉनचा शिरकाव*झिम्बाब्वेहून परतलेल्या 72 वर्षीय वृद्धाला ओमायक्रॉनची लागण, देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे तीन रुग्ण*३)हमीभाव समितीसाठी पाच नावं प्रस्तावित*कृषी कायदा विरोधकांचा केंद्र सरकारशी संवाद हमीभाव समितीसाठी पाच नावं प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्येअशोक ढवळे, गुरुनाम सिंग, शिवकुमार काका, युद्धवीर सिंग, बलवीर सिंग यांच्या नावांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here