टोकीयो मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ करणाऱ्या प्रविध जाधव यांचा क्रीडा मंत्री सुनिल केदार यांच्याकडून सत्कार

571


राज्यात उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरू
सातारा दि.10 (जिमाका): राज्यातील खेळाडूंनी खेळावरच लक्ष केंद्रीतत करणे गरजेचे आहे, राज्य शासन सर्व खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून राज्यात उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी दिली.


सरडे, ता. फलटण येथे तिरंदाज प्रवीण जाधव याच्या घरी क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी भेट देऊन प्रवीण जाधव यांचा सन्मान व सत्कार केला, त्या वेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, महेंद्र सूर्यवंशी – बेडके, महेश खुंटाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यामधील सरडे सारख्या छोट्याश्या गावामधून प्रवीण जाधव यांनी स्वतःची कला कौशल्य ओळखून क्रीडा प्रबोधिनीमध्ये जाऊन तिरंदाजी बाबतचे शिक्षण घेतले. तालुक्याचे व राज्याचे नाव उंचावेल अशी टोकियो येथील ऑलम्पिक मध्ये कामगिरी बजावली. या वेळेस नाही परंतु पुढच्या वेळेस प्रवीण हा देशासाठी व राज्यासाठी नक्कीच गोल्ड मेडल जिंकेल असा विश्वास क्रीडामंत्री श्री. केदार यांनी यावेळी व्यक्त केला.
क्रीडामंत्री म्हणून काम करत असताना या विभागाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन हा पूर्णतः वेगळा आहे राज्यांमध्ये विविध खेळांमध्ये खेळाडू निर्माण झाले पाहिजेत. खेळाडू म्हणून खेळत असताना प्रत्येक जण उतरल्यानंतर प्रत्येकालाच मेडेल मिळेलच असे नाही. परंतु खेळाडूंनी आपले सर्वस्व पणाला लावून खेळले पाहिजे. खेळाडूंसाठी पुणे येथील बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे.


प्रवीण जाधव प्रमाणेच आणखी खेळाडू फलटण तालुक्यामधून तयार व्हावेत, यासाठी फलटण येथे भव्यदिव्य क्रीडा संकुल उभारण्याबाबत विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. तरी फलटण येथे क्रीडा संकुल उभे राहण्यासाठी क्रीडा संचालनालयाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त निधी मंजूर करावा, अशी मागणी यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी केली.
यावर्षी टोकियो येथे झालेल्या ऑलंपिक मध्ये खेळताना मी आपल्या देशासाठी व राज्यासाठी पदक आणू शकलो नाही, परंतु आगामी होणाऱ्या ऑलिंपिक मध्ये मी नक्कीच पदक आणि त्या व त्यासाठीच मी कार्यरत राहीन, अशी ग्वाही यावेळी तिरंदाज प्रवीण जाधव यांनी सर्वांना दिली.
यावेळी फलटण तालुक्यामधील गुणवंत खेळाडूंचा सत्कार क्रीडामंत्री ना. सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आला.
000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here