
ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पहिला सामन्यात पाकिस्तान संघाला धूळ चारल्यानंतर भारतीय संघाने सिडनीच्या मैदानावर नवख्या नेदरलॅंड संघाचा धुव्वा उडवला.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला.. मात्र, सलामीवीर के. एल. राहुल (9) सलग दुसऱ्या सामन्यातही अपयशी ठरला.
? कॅप्टन रोहित शर्मा (53) व गेल्या सामन्याचा हिरो विराट कोहलीने (62) शानदार अर्धशतके झळकावली. मात्र, भारतीय संघाची धावांची गाडी खऱ्या अर्थाने पळवली ती, सूर्याने… अवघ्या 25 चेंडूत सूर्याने अर्धशतक झळावले.
? भारताची भेदक बाॅलिंग..
भारतीय संघाच्या 180 धावांचा पाठलाग करताना, नेदरलॅंडच्या नाकीनव आले. भुवनेश्वर कुमारने 3 ओव्हरमध्ये 9 रन देताना 2 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंह, अक्षर पटेल, अश्विन यांनीही प्रत्येकी 2 विकेट घेतल्या, तर शमीला 1 विकेट मिळाली.
?? नेदरलॅंड संघाने 20 ओव्हरमध्ये 9 बाद 123 धावा केल्या. त्यात टीम प्रिंगलचा सर्वाधिक 20 धावांचा वाटा होता. भारतीय संघाने तब्बल 56 धावांनी नेदरलॅंड संघावर विजय मिळवला. भारतीय संघाची पुढची मॅच 30 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार आहे.





