महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक;
टीईटी परीक्षेत घोटाळा केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक.
टी ई टी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेत अपात्र झालेल्या उदवारांना सुपेंनी पैसै घेऊन पास केल्याच पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांची कारवाई.
पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सुपे यांनी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेत अपात्र झालेल्या उमेदवारांना पैसे घेऊन पास केले असल्याचे समोर आले आहे.
आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले यांच्यानंतर आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जी .ए . टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख याच्या पिंपरी – चिंचवडमधील घरातून पुणे सायबर पोलिसांना शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची कागदपत्रं सापडली होती.
त्यामुळे टीईटीच्या परीक्षेत घोटाळा झाला असल्याचा पोलिसांचा संशय बळावला होता. गुरुवारी सकाळपासून तुकाराम सुपेंना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. अखेर आज पुणे पोलिसांनी सुपे यांना अटक केली आहे.