‘टाटा ग्रुपच्या’ ‘या’ कंपनीचे शेअर्स घेतले असते, तर आज झाले असते करोडपती..?

446
  • टाटा ग्रुपमधील (Tata Group) अनेक कंपन्या सध्या प्रॉफिटमध्ये दिसत आहेत. जबरदस्त कामगिरी करत भारतीय बाजारपेठेसह शेअर मार्केटमध्येही आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा आलेख वर चढताना दिसत आहे. देशातील दिग्गज टाटा ग्रुपच्या कंपन्यांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास अनेकपटींनी वाढल्याचे दिसत आहे.
  • काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये चांगलेच चढ-उतार दिसतानाही TATA ग्रुपच्या काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले. म्हणून तुम्‍हीही जर गुंतवणुकीसाठी TATA ग्रुपमधील कंपनीच्या शोधात असाल, तर टाटाच्या एका जबरदस्त कंपनीचा तुम्ही विचार करू शकता. या कंपनीने आतापर्यंत गुंतवणूकदारांना 25,733 टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा दिल्याचे सांगितले जाते.
  • ▪️ TATA ग्रुपमधील वातानुकूलित उत्पादने तयार करणारी कंपनी, एअर कंडिशनिंग आणि कूलिंग तंत्रज्ञानामध्ये आघाडीची कंपनी.
  • ▪️ व्होल्टाज कंपनीचा शेअर 4 रुपयांवरून थेट 1200 रुपयांपर्यंत पोहोचला.
  • ▪️ 22 वर्षांपूर्वी या कंपनीचा शेअर एनएसईवर 4 रुपयांवर लिस्ट झाला होता.
  • ▪️ गेल्या 5 वर्षांत Voltas कंपनीचा स्टॉक 346 रुपयांवरून 1,209 रुपयांपर्यंत वाढला (गुंतवणूकदारांना २४९.४२ टक्के परतावा
  • ▪️ गेल्या 22 वर्षांत गुंतवणूकदारांना सुमारे 25,733 टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा.
  • ▪️ जर एखाद्या गुंतवणूकदाराने 22 वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याच्या 1 लाख रुपयांचे 2.58 कोटी रुपये झाले असते, असं म्हणतात.
  • दरम्यान, TATA ग्रुपमधील रिटेल क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या Trent कंपनीचा शेअर 1 जानेवारी 1999 ला शेअर मार्केटमध्ये 09 रुपयांवर लिस्ट झाला आणि 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2012 रोजी Trent कंपनीचा शेअर एनएसईवर 94.04 रुपयांवर होता. आज काही दिवसांपूर्वी फेब्रुवारी 2022 मध्येच Trent कंपनीचा शेअर 1, 067 रुपयांवर पोहोचलाय. तसेच, टाटा ग्रुपमधील टायटनच्या शेअर्सने 23 वर्षांत 57,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here