झोपडपट्टी भागातील नागरिकांना दवाखान्यामुळे मोठ्या आधार- –माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक

    315

    तारकपूर बस स्टॅन्ड मागे रामवाडी येथे लाईफ केअर क्लिनिक दवाखान्याचे शुभारंभ.

    (प्रतिनिधी)- तारकपूर बस स्टॅन्ड पाठीमागे रामवाडी येथे लाईफ केअर क्लिनिक हॉस्पिटलचे शुभारंभ माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक व साई माऊली हॉस्पिटलचे सीईओ डॉ.तुकाराम गीते व डॉ दिपाली गीते व डॉ गणेश मिसाळ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले यावेळी लाईफ केअर क्लिनिकचे अफरोज पठाण, डॉ.तनवीर देशमुख, डॉ. तौसीफ देशमुख, खालिद शेख( समज सेवक ) , शेख फारुख फरशीवाला आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के, दानिश शेख, आसिफ पठाण, तौफिक देशमुख, अब्दुल पठाण, खालीद पठाण, गालिब पठाण, हाजी अब्दुल वहाब शेख, आतिफ शेख, जमीर इनामदार, आदिल शेख, मोईन पठाण, मेराज पठाण, शेख फारुख गुलाब (समाजसेवक) आदिसह रामवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.. यावेळी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक म्हणाले की रामवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी व वाढती लोकसंख्या च्या हिशोबाने तेथे हॉस्पिटल क्लिनिकची सोय नसल्याने रुग्णांना लांब जाऊन उपचार घ्यावा लागत असल्याने व वाढते साथीचे आजारामुळे या क्लिनिक हॉस्पिटलचे शुभारंभ करण्यात आले असून रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा असल्याने रामवाडी परिसरातील नागरिकांना या क्लिनिक हॉस्पिटलच्या माध्यमातून मोठा आधार होणार असल्याची भावना व्यक्त करत या क्लिनिकमध्ये डे.केअर, बालरोग, त्वचारोग, केस गळणे, डेंग्यू, टायफाईड, मधुमेह, उच्च रक्तदाब, फॅमिली फिजिशियन, आसे उपचार केला जाणार आहे..

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here