आळंदी: एका दुकानदार तरुणाचा एका महिलेसोबत वैयक्तिक वाद झाला. तो वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र एल्गार सेनेच्या अध्यक्षाने दुकानदार तरुणाकडून दोन लाख 84 हजार रुपयांची खंडणी घेतली. ही घटना डिसेंबर 2020 ते दोन एप्रिल 2021 या कालावधीत आळंदी येथे घडली.दत्ता लक्ष्मण झिटे (वय 30, रा. गंधर्व नगरी, मोशी) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 17) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विष्णू सुभाष कु-हाडे (रा. आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आळंदी-मरकळ रोडवर रमेश स्वीट होम नावाचे दुकान आहे. फिर्यादी यांचा एका महिलेसोबत वैयक्तिक वाद झाला. दरम्यान फिर्यादी आणि आरोपी महाराष्ट्र एल्गार सेनेच्या अध्यक्ष विष्णू याची ओळख झाली.फिर्यादी यांनी आरोपीला फिर्यादी आणि महिलेचे भांडण मिटवून देण्याची विनंती केली. ते भांडण मिटविण्यासाठी आरोपीने फिर्यादी यांच्याकडून रोख, गुगल पे, क्रेडिट कार्ड द्वारे एकूण दोन लाख 84 हजार रुपये खंडणी घेऊन मानसिक त्रास दिला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
स्वीडनमध्ये, एस जयशंकरचा “घी शक्कर” क्विप हिट झाला
स्टॉकहोम: परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी येथील भारतीय समुदायातील सदस्यांशी संवाद साधताना भारतीय संस्कृतीच्या जागतिकीकरणावरील प्रश्नाला...
डीपफेक क्लिपच्या निर्मात्याच्या अटकेवर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली: अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने आज तिचा डीपफेक व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यक्तीला अटक केल्याबद्दल दिल्ली पोलिसांचे...
अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रूग्ण वाचा सविस्तर बातमी
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 908 कोरोना रुग्ण आढळले आहेतालुका निहाय आकडेवारी पुढीप्रमाणे
अहमदनगर शहर 25, कर्जत 49,...
आसाम बालविवाह क्रॅकडाउन: 3 दिवसांत 2,273 अटक, निषेध सुरूच असल्याने परिस्थिती तणावपूर्ण
आसाममध्ये बालविवाहाची ४,०७४ हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली असून, आसाम पोलिसांनी राज्यात सलग तिस-या दिवशी कारवाई सुरू ठेवली...




