सुटीच्या दिवशीही पगार, पेन्शन होणार, EMI कापणार
बँकिंग व्यवहार रविवारी आणि इतर सुटीच्या दिवशी सुद्धा होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस सिस्टिम आठवड्यातील 7 दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थातच या बदलामुळे पगार आणि पेन्शन रविवार, बँक हॉलिडे आणि इतर सुटीच्या दिवसांमध्ये सुद्धा जमा केले जाणार आहेत. यासोबतच सुटीच्या दिवशी सुद्धा आता EMI पेमेंट कापल्या जाणार आहे.
महिला हॉकीमध्ये हॅट्ट्रिक मारणारी वंदना पहिली भारतीय_
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने विजय मिळवला, पदकाची आशा कायम; भारतीय महिला हॉकी संघाने पूल स्टेजच्या आपल्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 4-3 असा पराभव केला. यामुळे उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या संघाच्या आशा कायम आहेत. वंदना कटारियाने भारतासाठी 3 गोल केले.
बॉलिवूड: अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
जॅकी भगनानी आणि अक्षय कुमारने सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत ‘बेल बॉटम’ हा चित्रपट 19 ऑगस्ट 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. चित्रपटात अक्षयसोबत हुमा कुरेशी, वाणी कपूर, लारा दत्ता यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
? मोदींच्या बंधूंचे व्यापाऱ्यांना समर्थन!
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे व्यापारी आणि व्यावसायिक विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना जोरदार पाठिंबा दिला. आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जीएसटी भरू नका. आंदोलन तीव्र करा. मग, कुठलेही सरकार असो तुमच्या मागण्या त्यांना मान्य कराव्या लागतील असे प्रल्हाद मोदी म्हणाले आहेत.
? सोने-चांदीचा आजचा भाव काय?
मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 48,390 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,390 रुपये इतका आहे. एक किलो चांदीसाठी आता 68,210 रुपये मोजावे लागणार आहेत.
? बेन स्टोक्सने घेतला अनिश्चित काळासाठी ब्रेक!
इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने त्याच्या मानसिक आरोग्यामुळे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. अशा परिस्थितीत तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतही खेळणार नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर हँडल आणि वेबसाइटवर स्टोक्सविषयी माहिती दिली.
? जाणून घ्या देशातील आजची कोरोना स्थिती (31 जुलै रोजी स. 11.38 वाजता)
▪️एकूण सक्रिय रुग्ण : 4,02,874
▪️एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 3,07,73,569
▪️ कोरोनामुळे आतापर्यंत एकूण मृत्यू : 4,23,842
▪️ देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 46,15,18,479