ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाखांच्या पत्नी गौरी गडाख यांनी केली आत्महत्या!

एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी सौ. गौरी प्रशांत गडाख यांनी आत्महत्या केलीय.

आत्महत्येचं कारण मात्र समजू शकलं नाही. घटनेची माहिती समजताच तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. अत्यंत धक्कादायक आणि अनाकलनीय अशी ही घटना आहे.

जिल्ह्याच्या राजकारणातली ही धक्कादायक घटना आहे. या घटनेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गौरी गडाख यांनी नक्की कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.

आत्महत्येच्या या घटनेप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here