ज्येष्ठ नागरिकांनो; कुठल्याही तक्रारीसाठी मदत हवीये? एक काॅल करा

    132

    ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याची वाढती गरज लक्षात घेता, केंद्र सरकारने अखिल भारतीय टोल-फ्री हेल्पलाइन १४५६७ सुरू केली. ज्याला ‘एल्डर लाइन’ असे नाव देण्यात आले. पेन्शन समस्या, कायदेशीर समस्या या विषयी मोफत माहिती या हेल्पलाईनवर मिळू शकते. ही हेल्पलाइन ज्येष्ठ नागरिकांना भावनिक आधार देते. गैरवर्तन प्रकरणांमध्ये मदत करते. बेघर वृद्धांना आराम देते. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारींच्या निवारणासाठी राष्ट्रीय हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.

    हेल्पलाइनची वेळ – स. ८ ते रा. ८
    ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना सून छळत आहे. पाेटभर खायला देत नसेल. मुलाकडून हेळसांड हाेत असेल, पेन्शनची समस्या असल्यास या हेल्पलाइनच्या माध्यमातून मदत मागता येते

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here